0
2
0
9
7
4
होळीला कोकणात जाणारी गाडी रद्द !
मध्य, पश्चिम रेल्वेकडून होळी विशेष गाड्या सोडण्यात येतात; मात्र रेल्वे प्रशासनाने रोहा-चिपळूण मेमू रद्द केल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिवा-रोहा-चिपळूण मेमू स्पेशल १५ मार्चपासून बंद केली आहे. यामुळे होळीनिमित्त माणगाव, महाड, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, गुहागर तालुक्यांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
0
2
0
9
7
4



