ब्रेकिंग
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुस्तकाचे लवकरच होणार प्रकाशन,

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. पुस्तकाचे कव्हर पेज आता समोर आले आहे. ‘राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा’ अशी टॅगलाईन या पुस्तकाच्या कव्हरवर पहायला मिळते. ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ असे या पुस्तकाचे नाव असणार आहे. गृहमंत्री असताना देशमुखांवर झालेल्या आरोपांबद्दल या पुस्तकात अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची देखील शक्यता आहे.