⭕️दिवा शहर पत्रकार संघांच्या नूतन कार्यालयाचे गुढीपाडवा दिनी उत्साहात उदघाटन….
अमित जाधव-संपादक
*⭕️दिवा शहर पत्रकार संघांच्या नूतन कार्यालयाचे गुढीपाडवा दिनी उत्साहात उदघाटन*
*प्रशासकीय अधिकारी व राजकीय मान्यवरांची उपस्थिती*
ठाणे, दिवा. ता 2 एप्रिल ( संतोष पडवळ) – ठाणे मनपाच्या हद्दीतील वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरात दिवा शहर पत्रकार संघांच्या नवीन कार्यालयाचे दिवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके यांच्याहस्ते उदघाटन झाले.प्रसंगी नितीन शिंदे (अध्यक्ष म. रा.म. पत्रकार संघ, ठाणे), अभिनेत्री अशु सुरपूर, सुरेश वाघीरे (उपविभाग अभियंता), डॉ. अरुण गावडे (आरोग्य अधिकारी, ठाणे मनपा) मा. उपमहापौर रमाकांत मढवी, समाजसेवक गोवर्धन भगत उपस्थित होते.दिव्याची सांस्कृतिक शहर व वाढती लोकसंख्या म्हणून ओळख असलेल्या दिव्यात पत्रकार संघांचे आरती मुळीक-परब , संतोष पडवळ, अमित जाधव, किरण किरतकुडवे, संजय तांबडे, सचिन ठीक, स्नेहा कोलते यांचा हक्काचा पत्रकार संघ मिळाला आहे,
प्रसंगी भाजपाचे विजय भोईर, अशोक पाटील, रोशन भगत, सचिन भोईर, नरेश पवार, रेश्मा पवार, ज्योती राजकांत पाटील, अजय सिंह, समीर चव्हाण, गौरीशंकर पटवा तर भारतीय मराठा संघ प्रकाश पाटील, आदित्य कदम, सचिन कालगुडे, रामदास म्हसकर, बालाजी कदम तर शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी, विभाग प्रमुख उमेश भगत, आदेश भगत, मनसे तुषार पाटील, निकिता सालप राष्ट्रवादीच्या ज्योती निलेश पाटील आणी खेड रहिवाशी संघांचे प्रवीण उत्तेकर, निलेश पाटणे व सहकारी उपस्थिती होते.


