क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
अगासन येथे मोठ्या प्रमाणावर घरफोडी,तीन लाखाचा मुद्देमाल चोरीस…
अमित जाधव-संपादक
दिवा शहरातील आगासन गावातील रहिवासी स्वप्निल आंबेडकर बुधवारी रात्रापाळीला कामाला गेले होते.ते तेथून गुरुवारी पहाटे 5.45 वाजता घरी परत आले.दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात दोन लाख 91 हजार रुपयांची चोरी झाली.
चोरट्याने कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे नेकलेस,मंगळसुत्र,कानातील कर्नफुळे,पेंडल,साखळी,कानातले झुमके,अंगठ्या तसेच रोख आठ हजार रुपये,पाच हजार रुपयांचा डीव्हीआर असा एकूण दोन लाख 91 हजार रुपयांचा एवज चोरुन नेला.
त्याचबरोबर आधारकार्ड,पँनकार्ड,ड्रायव्हिंग लायसेंस,मतदान ओळखपत्र,रेल्वेपासही लांबविला.याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरुन अनोळखी चोराविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस पुढील तपास करीत आहेत.