ब्रेकिंग
रायगडनंतर आता ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव,

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव… चिकनची दुकाने बंद
रायगडनंतर आता ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोपरीत आता चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कोपरीतील चिकन विक्रीची दुकाने 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डुंबरेंच्या बंगला परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केल्या जात आहेत.