Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना,महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकले….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर येतीये. ढालकाठी बिरवाडी गावातील महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकले आहे. विहिरीत फेकलेल्या सहाही मुलांचा करुण अंत झाला आहे. हृदय हेलावणारी ही घटना आहे. धक्कादायक घटनेने जिल्ह्यात सन्नाटा पसरला आहे. मात्र महिलेने हे कृत्य का केले?, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.विहिरीत फेकलेल्या सहा मुलांपैकी चार मुलं आहेत तसेच दोन मुली आहेत. आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास महिलेने घराशेजारील विहिरीत या सहा मुलांना फेकले. मात्र तिने स्वत: कोणतंही टोकाचं पाऊल उचलेलं नाही. सहापैकी पाचजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.सदर घटना स्थळी पोलीस पोहचले असून पुढील कारवाई सुरू आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे