शनिवारी दिव्यात होणार भव्य लसमहोत्सव , एकाच दिवशी होणार 10 हजार नागरिकांचे लसीकरण…
अमित जाधव-संपादक
शनिवारी दिव्यात होणार भव्य लसमहोत्सव
एकाच दिवशी होणार 10 हजार नागरिकांचे लसीकरण…
ठाणे, ता. 30 : दिवा परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या लसमहोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. 10दहा हजार नागरिकांचे मोफत लसीकरण या महोत्सवात करण्यात येणार असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारचा लसमहोत्सव होत असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंतीनिमित्त माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकार्याने हा लसमहोत्सव दिवा येथील एस.एम.जी शाळा व दातिवली आगासन रोड येथे आयोजित केला आहे. या महो्त्सवास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, दिवा प्रभागसमिती अध्यक्षा सुनिता मुंडे, स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दिपक जाधव, अंकिता पाटील, दिपाली भगत, दर्शना म्हात्रे आदी उपस्थित राहणार आहेत.
दिवा शहराची लोकसंख्या ही सद्यस्थितीत 4 लाखांवर गेली आहे, या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. दिवा शहरात महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण शिबिर घेण्यात आले होते. परंतु अनेक नागरिकांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. दुकानदार, भाजी विक्रेते, रिक्षाचालक या सर्वांचे लसीकरण व्हावे या हेतूने हा लसमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या लसमहोत्सवात 10 हजार लसींचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा व नागरिकांनी लसीकरणास येताना आधारकार्ड व मोबाईल घेवून यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केले आहे. एकाच दिवशी 10000 हजार लसीकरण दिवा शहरात आयोजित केल्याबद्दल महापौरांनी प्रशासनाचे देखील आभार व्यक्त केले आहे.


