ब्रेकिंग
ठाण्यातील कासारवडवली परिसरात धक्कादायक घटना,22 व्या मजल्यावरून उडी घेऊन एका महिलेने केली आत्महत्या..
अमित जाधव - संपादक

ठाण्यातील कासारवडवली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 22 व्या मजल्यावरून उडी घेऊन एका महिलेने आत्महत्या केली आहे. पेनिकल इमारतीमध्ये एका रुग्णाला मसाज करण्यासाठी एक महिला आली होती. नंतर ती 22 व्या मजल्यावर गेली, तिथे तिने गुटखा खाल्ला अन् खाली उडी मारली. पती किडनीच्या विकाराने त्रस्त होता, तर मुलालाही डोळ्यांचा आजार होता त्यात आर्थिक परिस्थिती बेताची, असल्याने महिला प्रचंड नैराश्यात होती.