
संजय राऊतांचे बंधू आपला गड राखणार?
विक्रोळी मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत आहे. या मतदारसंघात संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे ठाकरे गटाकडून रिंगणात आहे. येथे सुनील राऊत विरुद्ध शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे असा सामना आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार येथे ठाकरे गट बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनील राऊत पुन्हा विजयी होण्याची शक्यता आहे. आता जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे, हे उद्या 23 तारखेला कळेल.