Breaking
ब्रेकिंग

दिव्यात इमारतीच्या शेडचे काम करत असताना दोन व्यक्ती कोसळले,एक जखमी तर एकाचा मृत्यू…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

इमारतीचे काम करताना अपघात होऊन ०१- व्यक्ती मृत व ०१- व्यक्ती जखमी आहे.दिनांक ०१/०२/२०२४ रोजी १२:३० वाजताच्या सुमारास सेंट मेरी शाळेजवळ, श्लोक नगर, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा, ठाणे या ठिकाणी सिध्देश्वर अपार्टमेंट या इमारतीच्या छतावर पत्र्याच्या शेडचे काम करत असताना तोल जाऊन ०२- व्यक्ती खाली पडून जखमी झाल्या होत्या.

अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे
१)श्री. चंदन दुबे *(पु / २३ वर्षे/ राहणार – मुंब्रादेवी कॉलनी, दिवा/ हनुवटीला किरकोळ दुखापत झाली असून आशीर्वाद हॉस्पिटल, दिवा येथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.)
२)श्री. लवकुश गौतम (पु / २३ वर्षे / राहणार – एकवीरा हाईट, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा / डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचाराकरिता निऑन हॉस्पिटल, पडले गाव, दिवा येथे दाखल करण्यासाठी नेण्यात येत असताना १३:०७ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला असून शवविच्छेदनासाठी पोलिसांमार्फत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे पाठविण्यात आला आहे.असे मुंब्रा पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत. कऱण्यात आली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे