बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा पश्चिमेचा पाणी प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी रेल्वे दरबारी मांडला…

अमित जाधव-संपादक

*दिवा पश्चिमेचा पाणी प्रश्न रेल्वे दरबारी*

दिवा पश्चिमचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी रेल्वे रुळाखालून येणाऱ्या मंजूर पाईप लाईन(पुश थ्रू) चे काम त्वरित सुरू करावे यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वे चे विभागीय व्यवस्थापक(DRM) श्री.गोयल यांच्या दालनात ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी *मा.उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, विभागप्रमुख उमेश भगत, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत*, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, पाणी खात्याचे साळुंखे आदी अधिकारी उपस्थित होते.
दिवा पश्चिमेला नियमित पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. दिवा पश्चिमेला पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी अन्य मार्ग उपलबध नसल्याने रेल्वे रुळाखालून पुश थ्रू पद्धतीने पाईप लाईन टाकावी अशी मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. मध्य रेल्वे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून हे काम होणार असल्याने आज मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात आज बैठक झाली. काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासन यावेळी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक व ठामपा आयुक्तांनी दिले. सदर बैठकीत *दिवा पूर्व-पश्चिम उड्डाणपूल चे कामाविषयी, आगासन फटकाजवळ पाईप लाईन टाकण्याचे रेल्वे प्रशासनाने थांबवलेले काम सुरू करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत व दिवा पश्चिमेला एन आर नगर परिसरात जाण्यासाठी रस्त्याचा विषय* आदी विषयांवर चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे