Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरात २२ वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता १३ ऑगस्ट : दिवा शहरात २२ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिवा पूर्वेतील मुंब्रादेवी कॉलनी येथील विष्णूदादा अपार्टमेंट रूम क्र ५०७ मध्ये सदर घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. अनिता अतिश बागडे (वय २२ वर्षे ) ही आपले पती अतिश सुधाकर बागडे (वय २८) व सासू सासरे यांसोबत रहात होती. घरात कोणीही नसतात अनिताने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. प्रसंगी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सदर मृतदेह पुढील कारवाईसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे.

सदर घटनास्थळी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी आढळून आली नसून आत्महत्येच कारण समजले नाही. प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस सदर आत्महत्या प्रकरणी पुढील पोलिस तपास सुरु आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे