विक्रोळी टागोर नगर १.नंबर येथील रस्त्याची दुरवस्था, डॅशिंग पत्रकार व समाजसेवक अविनाश थोरात यांनी फोडली वाचा……
अमित जाधव-संपादक
विक्रोळी पुर्व प्रभाग ११९ मधील एस विभाग परिरक्षण विभागाने एक वर्ष पण झाले नसेल सदर च्या रस्त्याचे कामकाज करुन सुध्दा एवढ्या लवकर कसे काय कामकाज निकृष्ठ दर्जाचे होत असतात? कामाची गुणवत्ता काय आहे की नाही? निदान पाच वर्ष तरी कामकाज दर्जामत्क व्हायाला पाहिजे तसे होताना दिसत नाही? पुन्हा काम केले तर आपल्याच सर्वसामान्य नागरिका च्या करातुन कामकाज दुबार होणार म्हणजे सर्व काही आपलेच नुकसान होणार असे निकृष्ठ दर्जाचे कामकाज करणार्या मनपा च्या ठेकेदारा चा प्रथम काळ्या यादीत समावेश करुन त्यांच्या अनामत रकमेतुन दुबार काम करण्यात यावे तसेच शासन व मनपा प्रशासनाची नियमानुसार कामे न करणार्या ठेकेदारावर कायदेशीर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये? तसेच अशा ठेकेदारांची बिले मंजुर करणार्या संबंधीत मनपा च्या अभियंता व अधिकार्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांची खात्यार्तगत सखोल चौकशी करण्या येऊन त्यांना बडतर्फ करण्यात यावे तेव्हाच निकृष्ठ दर्जाची कामे होणार नाहीत याची दक्षता नक्कीच परिरक्षण रस्ते विभागातील अभियंते व ठेकेदार घेतील