बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मुंब्र्यात वृद्ध महिलेच्या 17 लाखा पेक्षा जास्त घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अटकेत, एकूण १४ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

अमित जाधव - संपादक

ठाणे ता २४ जून : मुंब्रा शहरातील मुंब्रादेवी गेट जवळ वृद्ध महिलेच्या घराची आरोपीनी आपसांत संगनमत करून घरफोडी करून कपाटामधील लॉकर मध्ये ठेवलेली सेवानिवृत्तीची १७ लाख रोख रक्कम व ५ हजार किमतीची ०३ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठया घरफोडी चोरी करून नेले होते. सदर गुन्हयाचा कालावधी एक वर्षा आधी गुन्हा दाखल केला होता चोरांनी फिर्यादी यांचे घराचे बाहेरील दरवाजास नवीन कुलुप लावल्याने फिर्यादी गावावरून घरी आल्यानंतर सदर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चोरी नेमकी कोणत्या दिवशी केली याबाबत काहीही समजुन येत नसुन फिर्यादी यांचे बिल्डींग मध्ये सीसीटीव्ही फुटेज नसल्याने तपासामध्ये अडचणी येत होती. परंतु मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तपास पथकास सदर गुन्हयाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना देत मार्गदर्शन केले.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये आजुबाजुचे लोकांकडे तपास केला असता सदर बिल्डींगमधील हार्डवेअरच्या दुकानामधुन आरोपीत आफताब मैनुद्दीन मोमीन याने नवीन लॉक घेतले असल्याचे व आरोपीत जावेद सलीम शेख हा हार्डवेअरच्या दुकानामध्ये पोलीस लॉकबाबत काय तपास करीत होते याबाबत विचारणा करीत असल्याची माहिती मिळाली. तसेच चोरी केल्या नंतर आरोपीत यांनी महागडे मोबाईल, दुचाकी वाहने खरेदी केली असल्याचे व मौजमजा करीत असल्याची माहिती मिळाली. परंतु आरोपीत हे मिळुन येत नव्हते. सदर आरोपीतांचे हालचालींवर पोलीसांनी गुप्तरित्या लक्ष ठेवुन त्यांना ताब्यात घेवुन कौशल्यपूर्ण तपास करून त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीत १) जावेद सलीम शेख, वय २८ वर्षे, रा. मुंब्रा २) आफताब मैनुद्दीन मोमीन वय-२४ वर्षे, व्यवसाय-पाणी सोडणे, रा. मुंब्रा यांना दिनांक १९/०६/२०२५ रोजी अटक करण्यात येवून दोनही आरोपीत यांचेकडून ७,३०,८००/- रू रोख रक्कम, एक केटीएम मोटर सायकल, एक पल्सर मोटर सायकल, ०१ अॅपल मोबाईल, ०१ अॅपल कं. चा एअरपॉड, ०२ सॅमसंग फोल्ड मोबाईल, दोन सोन्याच्या अंगठया, एकुण ०६ घडयाळे अशी एकुण १४,३७,८००/- रू. चा मुददेमाल हस्तगत करण्यात मुंब्रा पोलीसांना यश आले आहे. आरोपीत यांना पोलीस कस्टडी मंजुर करण्यात आलेली असुन अधिक तपास चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे