Breaking
ब्रेकिंग

कल्याण शिळ रोडवरील वाहतूक बंद असताना दिवा शहरात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटवण्याची व वाहतूक पोलीस वाढविण्याची युवासेनेचे अभिषेक ठाकूर यांची मागणी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा -वाहतूक विभाग अधिसूचने मध्ये नमूद केल्याप्रमाणे दि. ०६/०२/२०२५ रोजी रात्री ००.०१ ते दि. १०/०२/२०२५ रोजी रात्री २४.०० वाजे पर्यंत कल्याण-शिळ रोड वरील ये-जा करणारी वाहतूक मुख्य रस्त्यावरून बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. सदर कालावधीत हलकी वाहने दिवा शहरातून वळवण्याचे जाहीर केलेले आहे.

त्यामुळे सदर कालावधी दरम्यान कल्याण डोंबिवली मधील चाकरमानी तसेच रहिवाशी हे दिवा शहरातून मार्गस्थ होऊन त्यांच्या इच्छित स्थळी जाणार असून या कालावधी मध्ये दिवा शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच दिवा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाले उभे असल्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे दिवा शहरातील वाहतूक सुरळीत राहण्याकरिता रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटवण्याची त्याचबरोबर वाहतूक पोलिसांची क्षमता वाढविण्याची मागणी युवासेनेचे अभिषेक ठाकूर यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे