Breaking
ब्रेकिंग

दिव्यात खासगी क्लासेसच्या शिक्षीकेची विद्यार्थीनीला जबर मारहाण, मुंब्रा पोलिसांनी कारवाई करत केला गुन्हा दाखल….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता १६ डिसें : दिव्यात खासगी क्लासेस मधून शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थिनीला दिवाळीचा अभ्यास न करण्याच्या शुल्लक कारणावरून लाकडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कृष्णामूर्ती क्लासेस मध्ये शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीच्या हात, पाय व पाठीवर असंख्य वळ उठविले आहे. मुलीच्या पालकांनी तत्काळ दिवा पोलीस चौकी (मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत) पोलिसांनी आरोपी शिक्षिकेवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीचा अभ्यास केला नाही म्हणून व दिवाळी होऊन कित्येक दिवस झाले असताना सुद्धा पुन्हा तोच अभ्यास करून घेण्यास शिक्षिकेने जबरदस्ती करत मुलीला मारहाण करत “मला अभ्यासाचे नाही तर तुझी आई मला ओरडते का” याच करणामुळे मी तुला मारले आहे असे शिक्षिकेने मुलीला मारते वेळी रागाच्या भरात सांगत होती असे पोलिस जबाबात मुलीने स्पष्ट केले आहे.

सदर घटनेची मुंब्रा पोलिस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसांनी योग्य दखल घेत क्लासेसच्या महिला आरोपी टीचर वर गून्हा दाखल केला असून शिक्षिकेस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे