मुंबईत कोरोनाची एन्ट्री,आढळले ५३ रुग्ण धाकधूक वाढली, केईएममध्ये कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू…
अमित जाधव - संपादक

मुंबई:- आशिया खंडातील काही देशांमध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान सुरु झालं आहे. सिंगापूर, हाँगकाँग येथे तर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसतोय. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा एन्ट्री घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे.सध्याच्या घडीला मुंबई महापालिका अंतर्गत एकूण ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकही कोरोना बाधित रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.*
महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या उपचार आणि मार्गदर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच रूग्णांसाठी मुंबई महानगरपालिका रूग्णालयांमध्ये विशेष खाटांची आणि विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड आजाराचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधून मधुन आढळून येतात. मागील काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे.*
*कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून आहे. जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे. परंतु मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. या बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये 20 खाट,20 खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी, 60 सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे 2 अतिदक्षता खाटा व 10 खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढविण्यात येईल.*
कोविड-19 च्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे. वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या (फॅमिली) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
*मुंबईत पुन्हा कोरोनाची एन्ट्री?*
केईएममध्ये कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू
*मुंबईतील केईएम रूग्णालयात कोरोनाबाधित असलेल्या दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.मृत्य झालेल्या दोन्ही रूग्णांना कोरोनासह इतर व्याधी होत्या, असं केईएम रूग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
कोरोना बाधित असलेल्या ५८ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झालाय, असं केईएम रूग्णालयाचं म्हणणं आहे तर १३ वर्षीय कोरोनाबाधित मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती देखील केईएम रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेनंतर केईएम रूग्णालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटलं होतं.
त्यामुळं केईएम रुग्णालयातील या दोन रुग्णांचे रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना आता हे स्पष्टीकरण समोर आलं आहे.