बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

रेल्वे कामगार शरद जयराम पाटील यांची ३२ वर्षे रेल्वेत सेवा देत अखेर निवृत्ती….. निवृत्ती समारंभ कळवा कारशेड चे कर्मचारी व मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मुख्य उपस्थित संपन्न…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता 6 ऑगस्ट : दिवा शहरातील समाजसेवक व मध्य रेल्वेवर वरिष्ठ मंडळ विद्युत इंजिन (TRS) कळवा कारशेड येथे MCM (MF) या पदावर 33 वर्षे काम केलेले व नॅशनल रेल्वे मजदुर युनियन कळवा शाखेचे अध्यक्ष कॉ. शरद जयराम पाटील हे नुकतेच सेवानिवृत झाले. पाटील यांनी रेल्वेत २० जून १९९१ पासून ते आजतागायत 33 वर्षे सेवा कार्य करत असताना कळवा कारशेड मध्ये सामाजिक कार्य करत राहिले व आपला वेगळा ठसा उमटवला. परिणामी संघटनेने त्यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती.

कळवा कारशेड मधील मुख्य प्रवेशद्वारा जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती शिल्पाचे स्थलांतर करत कळवा कारशेड मधील अंतर्गत असलेल्या उद्यानामध्ये स्व:खर्चाने महाराजांची स्थापना व संपूर्ण उद्यान सुशोभित करून एक सामाजिक बांधिलकी जपली.अशा सन्मानीय व्यक्तींचा आज निवृत्ती सभारंभ म्हणजे अनेक कामगार व अधिकाऱ्यांच्या उपस्थित शुभ आशीर्वादाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रसंगी कळवा कारशेडचे वरिष्ठ अधिकारी सी. डी. इ विकास चौव्हान, ए डी इ. ए. के गौतमजी सहीत सुपरवायझर व युनियनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच करशेड मधील सभासद मंडळ कॉ.आनंद जाधव (सचिव), कॉ.नरेश पाटील, कॉ.स्वप्नील यादव, कॉ. साईनाथ पाटील, ठाणे जिल्हा बँकेचे ज्ञानेश्वर पाटील, शिव सकाळचे स्वप्नील गायकर, शंकर म्हात्रे, कैलास पाटील, सदा तांडेल, अनिल नाईक, सज्जन पाटील, रत्नदीप मढवी, प्रवीण दळवी, राजा पाटील, भूषण भोईर, सोपान पाटील, मा. उपमहापौर रमाकांत मढवी आदी मान्यवर व मित्रमंडळ परिवाराने निवृत्ती समारंभात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे