ब्रेकिंग
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात गटप्रमुखांची नियुक्ती…
अमित जाधव - संपादक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर पक्षाचे वतीने गुडी पाडव्याच्या शुभ दिनी आज गट प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित श्री प्रवीण उतेकर उपशहर संघटक ,सो ज्योती राजकांत पाटील महिला संघटिका, संजय जाधव विभाग प्रमुख शनिदास पाटील विभाग प्रमुख, शशिकांत कदम शाखाप्रमुख, आदी पदाधिकारी मान्यवर व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच यापुढेही दिवा शहरात अनेक नियुक्त्या होणारच असून प्रथमच निष्ठावान कार्यकर्त्यांनां यंदा स्थान देण्यात येणार आहे असे यावेळी सौ पाटील यांनी कळविले आहे.