कल्याण महात्मा फुले पोलिस स्टेशन मधील घटना.. 25 मोटरसायकल चोरीचे गुन्हे असलेला आरोपी लॉकअप छा गंज वाकून अंधाराचा फायदा घेत पळाला….
अमित जाधव - संपादक
आज दिनांक 24-05-23 रोजी महात्मा फुले चौक पो. ठा.(जुनी ईमारत मधील ) लॉकअप येथे कल्याण तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजी. नंबर 524/23 भा.दं.वि. कलम 379 ( मोटर सायकल चोरी ) मधील अटक आरोपी नामे राम सखाराम काकड वय 19 वर्ष ,( बारीक शरीरयष्टी )राहणार वांद्रे ,पोस्टे पिवळी ,तालुका-शहापूर जिल्हा ठाणे हा 03:10 वाजताचे सुमारास लॉकपचा गज वाकवून पळून गेला आहे. सदर वेळी पहारेकरी असलेले कल्याण तालुका पो.स्टे. ASI रामचंद्र मिसाळ यांनी तसेच इतर गार्ड अमलदार यानी पाठलाग केला परंतु आरोपी अंधाराच्या दिशेने पळून बाजुच्या भिंतीवरून उडी मारून पळाला सदरवेळी ASI मिसाळ यांचे उजव्या हाताला दुखापत झाली. सदर आरोपीचा तात्काळ रात्रपाळी अधिकारी, DB पथकाचे अधिकारी /अमलदार यानी कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वे हॉस्पिटल परिसर , इतर ठिकाणी शोध घेतला परंतु मिळुन आला नाही. आरोपीच्या राहते गावी तात्काळ पोलीस पथक रवाना केले आहे सदर आरोपीचा शोध घेत आहोत.सदर आरोपी हा सराईत असुन याचेवर पालघर, ठाणे ग्रामीण, नाशिक हद्दीतील विविध पोलीस ठाणेमधे एकुण 25 मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महत्मा फुले चौक यांनी कळविले आहे.