दिवा नाक्यावरील मद्यपान खुलेआम करणाऱ्या मुळे महिला व शाळकरी मुळे तसेच रहिवासी यांना मनस्ताप, मा.नगरसेवक शैलेश पाटील आक्रमक…..
अमित जाधव - संपादक
ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिवा शहरातील वर्दळीच ठिकाण असलेल्या दिवा चौका जवळील अधिकृत असलेल्या (वाईन शॉप) दारूचे दुकाने असून सदर दुकानाबाहेर अनेक मद्यपी अनधिकृतपणे भर रस्त्यात खुलेआम मद्य सेवन करत असतात परिणामी यामुळे परिसरातील राहणारे स्थानिक महिला, वयोवृद्ध नागरिक तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी यांना रस्त्यावरून ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याचीच गंभीर दखल घेत मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी मुंब्रा पोलिसांना निवेदन देत त्वरित कारवाई करून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना व मुलींना होणाऱ्या या त्रासदायक मद्यपी पासून मुक्त करावे
सदर ठिकाणचे दोन दारूचे दुकान प्रशासनाने दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु असल्याने मध्य रात्री पर्यंत मद्यपी खुलेआम रस्त्यावर दारू पीत असतात परिणामी काही दुर्घटना घडल्यास प्रशासन जबादार राहील.पोलिस प्रशासनास विंनती आहे की सदर परिसरात गस्त वाढवून कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असेही पाटील यांनी कळविले आहे



