ब्रेकिंग
नवी मुंबई महापे येथे लॉजमध्ये छापत होते बनावट नोटा,पोलिसांचा लॉज वर छापा….

महापे येथे बनावट नोटांचे प्रकरण समोर आले. एक पुरुष आणि महिला येथील एका लॉजमध्ये बनावट नोटा छापत होते. विवेक पिपळे आणि अश्विनी सरोदे अशी दोघांची नावे आहेत. दोघेही आरोपी गेल्या चार महिन्यांपासून येथील कृष्णा पॅलेस लॉजमध्ये राहत होते. ते दोघेही एक वर्षापासून बेरोजगार होते. पण जॉब नसताना ते दोघे आलिशान लाईफ जगत असल्याने यांच्यावर काहींना संशय आला. याची माहिती मिळताच पोलीसांनी लॉजवर छापा टाकला.