बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भालचंद्र महाराज जि.प.शाळा कणकवली क्र.३चे मुख्याध्यापक सुभाष लोकरे सेवा निवृत,जनजागृती सेवा समितीच्या वतीने सन्मानित….

अमित जाधव-संपादक

भालचंद्र महाराज जि.प.शाळा कणकवली क्र.३चे मुख्याध्यापक सुभाष लोकरे सेवा निवृत,जनजागृती सेवा समितीच्या वतीने सन्मानित.–‐—————————————–कणकवली-शहरातील आदर्श शिक्षक म्हणुन नावलौकिक असलेले भालचंद्र महाराज जि.प.शाळा कणकवली क्र.३चे मुख्याध्यापक सुभाष लोकरे नुकतेच सेवा निवृत झाले.त्यांचा निरोप समारंभ शाळेच्या सभागृहात पालक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, सामाजिक संस्था,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सुभाष लोकरे सरांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर कार्यदक्ष राहुन शाळेसाठी अविरत मेहनत घेऊन भालचंद्र महाराज जि.प.शाळा कणकवली क्र.३सिंधुदुर्ग जिल्हात अव्वल स्थानावर नेऊन ठेवली.जनजागृती सेवा समितीच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांना संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते “सन्मानपत्र”व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी सहकारी शिक्षक वर्ग, व्यवस्थापन समिती,मित्र परिवार, माजी शिक्षक,माजी विद्यार्थी,शाळेतील विद्यार्थी यांच्यावतीने त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ, भेटवस्तू सपत्निक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सहकारी शिक्षक,व्यवस्थापन समिती पदाधिकारी,विद्यार्थी यांनी सुभाष लोकरे यांच्यासंबंधी आपल्या भावना व अनुभव व्यक्त केले. काही वेळ तर चेह-यावर हसु व आसु असा भानिक प्रसंग आला, व कंठ दाटुन आला.सुभाष लोकरे सर मित भाषी,क्रीयाशील,कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ,सदा बहार हसतमुख चेहरा अशी ख्याती होती.यावेळी प्रतिभा कोतवाल मॅडम यांनी सुभाष लोकरे सरांचा सविस्तर परीचय व दहा वर्षाचा त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. नितिन जठार सरांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे