ब्रेकिंग
लोकलच्या धडकेत कल्याण रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गर्जे गंभीर जखमी..
अमित जाधव - संपादक

लोकलच्या धडकेत कल्याण रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गर्जे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री बाराच्या सुमारास तानशेत खर्डी स्टेशन परिसरात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती कैलास गर्जेंना मिळाली. त्यामुळे तात्काळ ते घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करत असताना अचानक दोन्ही बाजूंनी लोकल आल्या. लोकलचा अंदाज न आल्याने गर्जेंना लोकलची धडक बसली.