कळवा रेल्वे स्थानक व स्थानक परिसर शिवसेनेचा पाहणी दौरा संपन्न….
अमित जाधव-संपादक
कळवा रेल्वे स्थानक व स्थानक परिसर शिवसेनेचा पाहणी दौरा संपन्न….
कळवा पूर्व व पश्चिम येथील प्रवाशांचे तक्रारींनूसार कळवा रेल्वे स्थानकांत शिवसेनेच्या वतीने पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर पाहणीत स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यां जाणून घेतल्या . परिवहन सेवेच्या घोलाईदेवी नगर व पारसीकनगर येथे चालविले जाणाऱ्या वाहक व चालक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या विचारात घेऊन बस स्थांबा बसेसचे वेळापञक बस स्थांब्यांवर लावणे. इत्यादींचे नियोजन करणे व काही समाजकंटक वाहक-चालक यांना ञास देतात त्यांचा बंदोबस्त करणे. स्थानक व स्थानक परिसरातील स्वच्छता राखणे करीता संबंधित कंञाटदार यांचेकडे संपर्क करणेत आला. तिकिट खिडक्या अपुऱ्या असून त्या त्वरीत वाढविणे साठी स्थानक प्रबंधक विनोद कुमार यांचेशी बैठक घेतली.
तिकिट वितरण यंञ वाढविणे व बंद असलेल्या तिकिट मशिन दुरुस्थी करुन त्वरीत कार्यान्वित करुन सेवा वाढविणेस सांगितले आहे. गर्दीच्या वेळी दिव्यांग, प्रथम वर्ग महिला डबा येथे पोलिस उभे करण्याचे सांगितले आहे. कळवा ते मुंबई व दिवा ते ठाणे अशा गर्दिच्या वेळी विशेष गाड्या सोडून कळवेकर प्रवाशांच्या जुन्या मागणीची पूर्तता करणेस सुचविले.
वरिष्ठांचे आदेशानूसार घेण्यात आलेल्या पाहणी दौऱ्यात जिल्हा संघटक लताताई पाटील यांचे समवेत नगरसेविका मंगल कळंबे,, तसेच विजय देसाई, अरविंद सैतावडेकर, दुर्योधन फडतरे, मधूकर भट, मुकुंद ठाकूर, दत्ता कळंबे, संजय सैनी, दिनेश ठाकूर, वैभव शिरोडकर, सहदेव धुरी, सुनील कासेकर, छाया आरमृगम, दक्षता कळंबे इत्यादी शिवसेना पदाधीकारी उपस्थित होते.
तसेच विधानसभा उपप्रमुख श्री. नरेंद्र शिंदे यांनी सकाळी रेल्वे स्थानकास भेट देऊन रेल्वेच्या संबंधित अधीकारी यांचेशी चर्चा केलेली आहे.


