बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाचा हळदीकुंकु समारंभ उत्साहात संपन्न. —————–

अमित जाधव-संपादक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाचा हळदीकुंकु समारंभ उत्साहात संपन्न. ———————————————————-‐——-बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-तिळगुळ घ्या गोड गोड बोला,मकर संक्रांतीचा हा सण महिलावर्ग घराघरात व सार्वजनिक ठीकाणीही उत्साहात साजरा करत असतात.याच सणाचे औचित्य साधुन येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाने श्री अपार्टमेंट,अभिनव बॅकेच्यावर,गांधी चौक बदलापुर(पुर्व)येथील संपर्क कार्यालयात मंडळाच्या महिला सदस्यांचा उपस्थितीत हळदीकुंकु समारंभ उत्साहात साजरा केला.याप्रसंगी मंडळाच्या खजिनदार सौ.सुवर्णा कदम,सौ.प्रियांका पाताडे,सौ.भावना परब,सौ.अर्चना उतेकर,सौ.वैभवी परब,सौ.गंधाली तिरपणकर व इतर महिला उपस्थित होत्या.हळदकुंकु,सौभाग्य वाण,पुष व तिळगुळ देऊन हा हळदीकुंकु समारंभ रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाच्या महिला सदस्यांनी उत्साहात साजरा केला.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सेक्रेटरी मंगेश कदम,उपाध्यक्ष विजय परब,सुनिल सदडेकर,मंडळाचे माजी अध्यक्ष विजय सावंत,अरविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.कोविड १९च्या नियमानुसार हळदीकुंकु समारंभ मर्यादित स्वरूपातच आयोजित करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे