दिव्यात बसेस सुरू पण बस थांबेच नाहीत, सर्वसामान्य दिवेकर नागरिक गोंधळात..ठाकरे गटाचे विभाग प्रमुख नागेश पवार आक्रमक..
अमित जाधव - संपादक
ठाणे – दिवा शहरात बस थांबे उभारण्यात यावे या करता शिवसेना उ.बा.ठा पक्षाचे विभाग प्रमुख नागेश पवार यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांची भेट घेऊन निवेदन दिले
दिवा शहरातून मागील अनेक महिन्यांपासून दिवा स्टेशन ते डोंबिवली स्टेशन दरम्यान T.M.T बस सेवा सुरू करण्यात आली आहे, परंतु अद्याप दिवा शहरात बस थांबे नसल्याने किंबहुना ते सुनिश्चित केले गेले नसल्याने व बहुतांश नागरिकांपर्यंत वेळापत्रकाची माहिती पोहोचली नसल्या कारणाने दिवा शहरातील नागरिकांना परिवहन सेवेचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पालिका प्रशासनाने लवकरात लवकर दिवा शहरातील सर्व बस थांबे निश्चित करून द्यावेत व तेथे सुसज्ज थांबे उभारण्यात यावेत तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्या करता सर्व थांब्यावर वेळापत्रकही लावण्यात यावेत असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे जेणे करून T.M.T च्या आर्थिक उत्पन्नातही भर पडेल व दिवा शहरातील नागरिकांचा प्रवासही सुखकर होईल असे पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.