
ठाणे ता ५ जुलै : दिव्यातील आगसन रोड या मुख्य रस्त्यावर सकाळी ११ वाजताच्या आसपास बेडेकर नगर येथे ट्रकच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे. दिव्यात राहणारे दीपक हेमले (वय अंदाजे 55) हे बेडेकर नगर येथे रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या (MH 12 HD 9974) धडकेत दीपक हेमले डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. प्रसंगी घटनास्थळी त्वरित मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस दाखल झाले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ट्रक चालकास दिवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.
दीपक हेमले यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार असून यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक परिसरसतील मित्र मंडळी दीपक हेमले यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत.