Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील युवकांचा भीमा शंकर येथे पायी पदयात्रा,आयोजक ह.प.भ श्री.बिंदास म्हात्रे ..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता १४ सप्टेंबर : दिवा शहरातील बी एम ग्रुप (दिवा-दातीवली तलाव) गेली पाच वर्षांपासून भीमाशंकर पदयात्रा पार पडली आहे. सदर पदयात्रा ही दिवा-दातीवली ते बदलापूर, नेरळ, खांडस गावापासून डोंगराळभागातून सात डोंगर पार कडून सदर बी एम ग्रुप आपल्या एकूण २५ सभासदांची पदयात्रा भीमाशंकर मंदिरात पोहचते. प्रसंगी श्री महादेवाचे दर्शन करून पुन्हा त्याच मार्गाने परत दिवा- दातीवली येथे येते. सदर भीमाशंकर पदयात्रेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिवा- दातीवली तलाव येथे आज शिवभंडारा उत्साहात संपन्न झाला प्रसंगी शेकडो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर विकास गजानन म्हात्रे (स्थायी समिती सभापती, क डो म पा) मा. उपमहापौर रमाकांत मढवी, युट्युब स्टार सॅमी कालण यांच्यासह दिवा शहरातील अनेक मान्यवरांनी शिवभंडाऱ्याला उपस्थिती लावली.

बी एम ग्रुपचे अध्यक्ष ह.भ.प श्री बिंदास म्हात्रे यांच्या सर्व नियोजनबद्ध पदयात्रेचे नियोजन असते. सदर ग्रुपचे विलास पाटील, सिद्धेश मेस्त्री, रविराज शिंदे, ओमकार चव्हाण, रुपेश गुरव, सूरज चाळके, सचिन पाटील, अभय पाटील यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे