Breaking
ब्रेकिंग

दिवा डंपिंग बंद असताना देखील रस्त्यालगत अनधिकृतरीत्या डंपिंग वर कचरा… युवा सेनेचे अभिषेक ठाकूर आक्रमक

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा डम्पिंग ग्राउंड रस्त्यालगत अनधिकृतरित्या खाली करत असलेले डंपर त्वरित बंद करण्याची युवासेनेचे अभिषेक ठाकूर यांची ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे मागणी.

दिवा डम्पिंग ग्राउंड गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आले असून सुद्धा येथे कचऱ्याचे डंपर खाली केल्याचे निदर्शनात आले.
भंडार्ली येथे सुरू करण्यात आलेले डम्पिंग बंद करण्यासंदर्भात तेथील नागरिकांनी तीव्र विरोध करण्यात आल्याचे अलिकडच्या काळात वृत्तपत्रात वाचनात आले त्यामुळे दिवा डम्पिंग पुन्हा एकदा सुरु होते की काय अशी चर्चा सध्या दिवा शहरात आहे. आत्ता कुठे दिवेकरांची डम्पिंग पासून सुटका झाली होती तो पुन्हा अनधिकृत रित्या कचऱ्याच्या गाड्या दिवा डम्पिंग रस्त्यालगत टाकण्यात आल्याचे निदर्शनात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
त्या अनुषंघाने आज ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त यांना पत्रव्यवहार करून कचऱ्याचे डंपर बंद करण्या बाबत मागणी युवासेना दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे