Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘समाजयोद्धां’चा सन्मान….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘समाजयोद्धां’चा सन्मान

* अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF), पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली (भारत), खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघ, आ.रोहित पवार फाउंडेशन कोकण विभाग यांचा उपक्रम

कर्जत (जि. रायगड) / प्रतिनिधी :- मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि. ६ जानेवारी २०२२ रोजी कोकण मॅरेज हॉल अंजरूण गांव (खोपोली) येथे कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम करणारे स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महावितरण कर्मचारी, रेशन दुकानदार, पोलीस अधिकारी – कर्मचारी व पत्रकार यांचा त्यांनी समाज व देशासाठी केलेल्या कार्याची दखल घेत अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF), पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली (भारत), खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघ, आ.रोहित पवार फाउंडेशन कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलिस मित्र असोसिएशन (नवी दिल्ली -भारत) चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नगरसेवक सुनील पाटील, जेष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, वरिष्ठ पत्रकार प्रविण जाधव, खोपोली महावितरण अभियंता सतीश गढरी, पोलिस मित्र संघटना प्रदेश प्रभारी हरीश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष आकाश हिवराळे, औरंगाबाद महापालिका शॅडो मंत्रिमंडळाचे महापौर विकास शिंदे , श्री ताकई विठ्ठल मंदिर देवस्थान उपाध्यक्ष जयंत पाटील, उद्योजिका कांचनताई जाधव, नॅशनल स्पोर्ट्सपर्सन शितलताई गायकवाड, खालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर माने व्यासपीठावर उपस्थित होते.

या सोहळ्यात रणरागिणी शितलताई गायकवाड, तहसिल प्रशासन खालापूर, खोपोली नगर परिषद प्रशासन, खालापूर नगर पंचायत प्रशासन, जेष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ, प्रेस क्लब खालापूर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, खालापुर तालुका पत्रकार संघ, रायगड जिल्हा जर्नालिस्ट असोसिएशन, सहज सेवा फाउंडेशन खोपोली, खालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार सागर जाधव, रायगड न्यूज संपादक गौस खान पठाण, साप्ताहिक बहुजन संकल्पचे आकाश जाधव, तय्यब खान, युवा उद्योजक निलेश यशवंत मोने, स्वच्छता कर्मचारी खोपोली, स्वच्छता कर्मचारी खालापूर, पाणीपुरवठा कर्मचारी खोपोली, पाणीपुरवठा कर्मचारी खालापूर, महावितरण कर्मचारी, शासकीय वैद्यकीय रुग्णालय आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, शिवसेना अवजड वाहतूक सेना उपसचिव अल्ताफ मंसूरी, सुधाकर बुवा पाटील, राष्ट्रीय किर्तनकार सचिन महाराज तांडेल, पत्रकार सुधीर देशमुख, संजय पाटील, प्रविण जाधव, पंकेश जाधव, जलाउद्दीन शेख, प्रशांत गोपाळे, पंढरीनाथ कुरंगले, नवज्योत पिंगळे, शिवाजी जाधव, गुरूनाथ साठेलकर, समाधान दिसले, नरेश जाधव, सचिन यादव, रोहिदास जाधव, दिनेश पाटील, प्रसाद अटक, संतोष गोतारणे, राकेश खराडे आदींचा सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे