महिला दिना चे औचित्य साधून “आचल पुरस्कार” देऊन कतृत्ववान महिलांचा सन्मान….
अमित जाधव - संपादक
ठाणे
मॅजिकल चार्मंटे आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय “आचल पुरस्कार” सोहळा ठाण्याच्या गडकरी रंगायतन लॉन येथे आयोजित करण्यात आला. “आचल पुरस्कार” सोहळ्याची संकल्पना सौ. समृध्दी पाटील यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आली. आचल पुरस्कारासाठी राज्यभरातील निवड कतृत्ववान महिलांची निवड करुन पुरस्कार नामांकन करण्यात आले.
“आचल पुरस्कार” सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणुन अलका देशमुख पी. आय. क्राईम ब्राँच, सुप्रिया दळवी मुंबई पोलीस, रंजना साडोलकर समाजसेविका, दिपा परब पहिली महिला बाऊन्सर कं., साची वाडकर महिला पायलेट, पुनम चांदोरकर मॉडेल यांच्या उपस्थीतीत विविध क्षेत्रातील कतृत्ववान महिलाचा “आचल पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे मानकरी संचालिका काजल गुरव, मेकअप् आर्टिस्ट अस्मिता शिंदे, क्रीएटीव्ह डिझायनर मयुरी कौलगुड, वास्तुविशारद दिना सतरा, फिजियोथेरपीस्ट डॉ. पायल जैन, उद्योजिका स्मिता ठक्कर, बालक उपचारतज्ञ कोमल देसाई, उद्योजिका विभुती कामत, कायदेतज्ञ मित्तल देडिया, चित्रकार प्रज्ञा कानडे, डॉक्टर श्वेता पाटील, अर्थसहाय्य मार्गदर्शक सुनंदा भोसले, एच. आर. साजिरी उत्तुरकर, गायिका डॉ. विशाखा जगताप, अभिनेत्री ज्योती गायकवाड, पत्रकार सृष्टी कुलकर्णी, नगरसेविका मालती पाटील, पत्रकार जोती चिंदरकर, नगरसेविका प्रतिभा मढवी, मनसे उपशहर अध्यक्षा मंजुळा डाकी, प्राध्यापिका लिडीया सालीयन, फॅशन डिझायनर मोना जैन, सहसीखेळाडु प्रतिक्षा डाकी, वैद्यकिय अधिक्षक माधवी खराडे, कोमल देडिया, मॉडेल सुनिता पनीकर, इंटिरीयर डिझायनर सुमन यादव, सौंदर्यप्रसादक उप्तादक जुही नेलवाल या सर्व कतृत्ववान महिला “आचल पुरस्कारच्या” मानकरी ठरल्या.
या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकर संघाचे पदाधिकारी, न्युज मराठी बाणा, दैनिक मी सुधारक, वृत्तसंग्राम, न्युज मॉल, तरुण आव्हानचे संपादक सुबोध कांबळे, चौफेर वार्ताचे संपादक जितेंद्र पाटील, डेमोक्रेटिक इंडियाचे संपादक अतुल तिवारी, प्रजासत्ताक जनताचे संपादक सुबोध शाक्यरत्न, बेधडक न्युजचे संपादक अमित जाधव, सौ. चंदन पाटील ह्यांची सोहळ्या उपस्थिती महत्वपुर्ण होती. तसेच प्रायोजक म्हणुन मॉम कम्युनिटी पार्टनर मॉममनचकीन स्कॉड, नेटवर्क पार्टनर मराठी उद्योजिका, पब्लिकेशन पार्टनर भाबाड पब्लिशर, फोटोग्राफी पार्टनर सिध्देश पेंडे, चारीटी पार्टनर दादा ताई फाऊंडेशन, मोनार्च डिझायनर, अंकिता मेकउप आर्टिस्ट, गिफ्ट पार्टनर कोमल देडिया व स्वीट टेल्स यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
“आचल पुरस्कार” सोहळ्याचे आयोजक समृध्दी पाटील याचे संयोजक विजय पाटील यांची महत्वाची भुमिका होती तर “आचल पुरस्कार” सोहळी मुख्यधुरा आपल्या खास शेरोशायरी अंदाजात निवेदिका / अभिनेत्री सविता हांडे यांनी मोठ्या दिमाखात “आचल पुरस्कार” सोहळ पारपाडला.



