ब्रेकिंग
ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत.. बिघाड,मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अमित जाधव - संपादक
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण ते कुर्य्यादरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून लोकलसेवा ठप्प झाली. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोर जावे लागत आहे. तसेच काही प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग निवडला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू आहे.