Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित नारी शक्ती सन्मान व शिव सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित नारी शक्ती सन्मान व शिव सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री.वसंत मुंढे, राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे,प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ जाधव, मुबंई विभाग प्रमुख श्री. रणधीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय अध्यक्ष श्री.नितीनजी शिंदे व ठाणे शहर उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने *छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान 2022व शिव सन्मान 2022 पुरस्कार* सोहळ्याचे आयोजन गडकरी रंगायतन ठाणे येथे करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद प्रल्हाद इंगळे यांच्या उपस्थितीत सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, रिपाई ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटक ओबीसी विभाग सुरेश खाडे,गडकरी रंगायतन व्यवस्थापक घोगे, डाँ अमोल गिते, ज्येष्ठ संपादक अरविंद जितेकर, साहित्यीक पत्रकार प्रभाकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई, स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले,डाँ बाबासाहेब आंबेडकर, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि अभिवादन करत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली
महिला दिनाचे औचित्य निमित्त नारी शक्ती पुरस्काराने स्री कर्तुत्वाला सलाम देत कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला शासकीय कामात निडर वुत्तीचे कर्तव्य बजावणार्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे,पोलिस उपनिरिक्षक मिस.सोनी सदाशिव शेट्टी,महिला पोलिस नाईक सौ.यशोदा चद्रकांत घोडे,सहाय्यक आयुक्त, नवी मुबंई मिताली चिंचीते,
मिसेस इंडिया नक्षत्र अर्चना पवार,मुख्य संपादिका – टिव्ही न्यूज चौफेर वार्ता सौ कल्याणी भांगरे “जलपरी व हवाईपरी” म्हणुन देशात नावलौकिक मिळविलेल्या सई अशिष पाटील,शिक्षिका सौ.माधुरी विकास मेटांगे,अभिमान महिला मंडळ अध्यक्षा सौ.प्रिती कैलास खाणेकर, उद्योजिका,व्यवसायिका रूबिना धारवार यांच्यासह समाजसेविका सौ.रूपाली चापले, सौ.मनिषाताई करलाद, सौ.राधाबाई जाधवर, विद्या दिलीप शिंदे,श्रीमती. हेमांगी संदीप चोरगे, कायदेशीर सल्लागार स्नेहल निकाले,लेखिका वैशाली चव्हाण यांना *नारी शक्ती सन्मान 2022* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शिवजंयती निमित्ताने शिवसन्मान पुरस्काराचे मानकरी पत्रकार, छायचित्रकार सुभाष जैन, मुख्य संपादक – टिव्ही न्यूज चौफेर वार्ताचेे जितेंद्र पाटील, शासकीय सुरक्षारक्षक सोमनाथ पालवे, साहसी शिवकाली खेळ प्रणय शेलार,उत्कुष्ठ रांगोळी धंनजय माने, सिध्दीविनायक हाँस्पीटलचे डाँ अमोल गिते,सचिन रांजणे समाजसेवक भानुदास शिंदे यांना *शिवसन्मान 2022* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सांगता सुभाष जैन यांच्या *”स्त्री भूण हत्या थांबवा* व भानुदास शिंदे यांच्या *”चला नाते रिचार्ज करूया”* या कवितेने करण्यात आली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे