ब्रेकिंग, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांकडून अटक….
अमित जाधव-संपादक
*⭕️ब्रेकिंग, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांकडून अटक.*
मुंबई, ता 1 फेब्रु ( संतोष पडवळ) : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊंवर विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. धारवी पोलीस ठाण्यात विकास जयराम पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ आणि इकरा खान यांच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल मुंबईतील धारावी परिसरात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले. प्रत्यक्षात दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षा ऑनलाइन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. यादरम्यान हजारो विद्यार्थ्यांनी जवळपास तासभर या भागातील मार्ग रोखून धरला. त्यामुळे संपूर्ण धारावी परिसरात भीषण चक्का जाम झाला होता. विद्यार्थ्यांचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.