Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

उसाच्या ट्रकला कार धडकल्याने भीषण अपघातामध्ये तिघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️उसाच्या ट्रकला कार धडकल्याने भीषण अपघातामध्ये तिघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू.*

अहमदनगर, ता 13 फेब्रुवारी : श्रीगोंदा येथून काष्टी येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी रात्री एक वाजता हॉटेल अनन्या समोर घडली.

या अपघातात राहुल आळेकर, केशव सायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना हा अपघात झाला. तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताचे नेमके कारण समजले नाही. मात्र, श्रीगोंदा ते दौंड हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आणि मोठ असल्याने वाहनांची गती अधिक असते. तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे बोललं जातं आहे.

राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला याला काष्टी येथे सोडविण्यासाठी जात असताना हाॅटेल अनन्यासमोर नादुरुस्त असलेल्या उभ्या उसाच्या टेलरला पाठीमागून त्यांच्या कारची जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला.या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे