
ठाणे ता २७ जून : दिव्यातील अधिकृत शाळा १ जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिपेन्डन्ट स्कूल मॅनेजमेंट ओशिएशन या संघटनेच्या वतीने शाळा बंद करण्यात येणार आहे. वारंवार तक्रार करूनही दिव्यातील बेकायदा शाळा बंद होत नसल्याने शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा बेमुदत बंद करत असल्याचे पत्रही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्व सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. बेकायदा शाळांवर कारवाई होत नसल्याने बेमुदत आंदोलनाचा इशारा शाळांना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळा बंद ठाणे महापालिकेच्च्या शिक्षण विभागाच्च्या दुर्लक्षामुळेच या बेकायदा शाळांना अभय मिळत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यातील अधिकृत शाळा १ जुलै पासून बेमुदत बंद राहणार असल्याचा दावा संघटनेच्च्या वतीने करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली जाते. या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते. महापालिका हद्दीत आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकडा अधिकचा असलेला दिसून आला आहे. सध्या इंग्रजी चांगली मागणी असल्याने नावजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही, त्यामुळे याचाच फायदा घेत झोपडपट्टी भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत आहे. दिव्यात आजघडीला ८१ शाळा या बेकायदा असल्याचा दावा या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.