मुंबईतील साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर….
संतोष पडवळ-कार्यकारी संपादक
♦मुंबईतील साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर.*
मुंबई, ता 13 : गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईला सुन्न करणारी घटना गेल्या आठवड्यात साकीनाका परिसरात घडली.
एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केले.
या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अंधेरी साकीनाका परिसरात राहणारा आरोपी मोहन चौहान याने पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली आहे.
“पीडित महिला ही विशिष्ट समाजाची असल्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.
आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे आणि त्याने गुन्हाच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
घटनास्थळावर गुन्हा कसा घडला या घटनाक्रमातून सर्व पुरावे मिळाले आहेत.
आरोपीकडून गुन्हासाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलं आहे,”
असे हेमंत नगराळे यांनी सांगितलं.
“राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली.
मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी शासकीय योजना जाहीर केली आली आहे.
मुख्यमंत्री निधीतून आणि शासकीय योजनांमधून पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे,”
असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.