दिव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा,दिवा शहरातील नागरिकांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार या इतिहासिक साक्षीदाराचे मानकरी होण्यासाठी तमाम दिवावसियानी उपस्थित रहावे असे आवाहन…. मा.उप महापौर रमाकांत मढवी
अमित जाधव - संपादक
ठाणे शहराबरोबर वेगाने वाढणाऱ्या दिवा शहरातील नागरिकांनाही ठाणेकरांसारख्या सेवा- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दिवा शहरावर विशेष प्रेम असणारे स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दिवा शहर व परिसरात होणाऱ्या विविध विकास कामाचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा बुधवार दिनांक 7 जुन 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे अशी माहिती शिवेसना दिवा शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली आहे.
मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये दिवा विभागाचे नागरिकरण झपाटयाने होत असून आजमितीस या विभागाची चार ते पाच लोकसंख्या आहे याठिकाणी राहणारे नागरीकरण मध्यमवर्गीय आहेत या नागरिकांना मुलभूत सोईसुविधा मिळाव्यात यासाठी स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर मानदंड ठरणारे विशेष प्रकल्प राबविण्याच संकल्प शिवसेना पक्षाने घेतलाअसून याला मुहूर्त स्वरुप देत एकाच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 7 जुन 2023 रोजी आयोजित केला असून यामध्ये प्रामुख्याने दुपारी 4.00 वा पुरातत्व खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे भुमिपूजन, सायं 5.00वा आगरी कोळी वारकरी भवन भुमिपूजन व सायं 06.00 दिवा शहरातील धर्मवीर नगर, दिवा आगासन रोड दिवा येथे दिवा शहरातील नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन मुख्य रस्ता, आरोग्य केंद्र, दातिवली गाव येथे व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गाव येथील शाळा या कामाचा लोकार्पण सोहळा तर आगासन देसाई खाडी पुल, सामाजिक भवन धर्मवीर नगर, दातिवली तलाव सुशोभिकरण, दिवा शीळ रोड, देसाई गाव तलाव या कामांचे भुमिपूजन होणार आहे. तसेच दिवा शहरातील नागरिकांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार असून या सोहळयास मोठया संख्येने उपस्थित राहुन या ऐतिहासिक सोहळयांचे साक्षीदार व्हावे असे आवाहन शिवेसना दिवा शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केले आहे.
या सोहळयास स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे, उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक शैलेश पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, दिपक जाधव, माजी नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, सुनीता मुंडे, दिपाली भगत, शहर अधिकारी युवती सेना साक्षी मढवी, उपशहर प्रमुख गणेश मुंडे, ॲड आदेश भगत, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, शशिकांत पाटील, उमेश भगत, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत आदी शिवसैनिक पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी व कार्यकर्ते दिवावासीयानी देखिल मोठया संख्येने उपिस्थत रहावे असे आवाहन शिवेसना दिवा शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केले आहे.
–



