Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीमहाराष्ट्र

प्रसिद्ध लेखिका ज्योती किरण किरतकुडवे यांच्या हिंदी लफझ – ए – शायर पुस्तकाचे प्रकाशन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते संपन्न….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

 

प्रसिद्ध लेखिका ज्योती किरण किरतकुडवे यांच्या हिंदी लफझ – ए – शायर पुस्तकाचे प्रकाशन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते संपन्न.

मुंबई – सम्यक ज्योती सामाजिक संस्थेच्या संस्थापिका/अध्यक्षा ज्योती किरतकुडवे यांच्या (हिंदी शायरी) लफझ – ए – शायर पुस्तकाचे प्रकाशन दिनांक १० एप्रिल 2022 रोजी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले. ज्योतीताई किरतकुडवे (साबळे) या लेखिका असून त्या एक सामाजिक संस्था सुद्धा चालवतात. त्यांचे जास्तीत जास्त लिखाण हे सामाजिक विषयावर आहे. त्याचबरोबर त्यांनी आपली आवड जपत हिंदी कविता, मराठी कविता त्या वेळोवेळी प्रकाशित करत असतात. त्या उत्तम कवयित्री आणि गायिका सुद्धा आहेत.
साहित्यक्षेत्रात महिलांनी पुढे जावे असे मत त्यांनी पुस्तक प्रकाशनावेळी व्यक्त केले. आपलं लिखाण सातत्याने करावे आणि साहित्य क्षेत्रात आपले नाव मोठे करावे तसेच त्यांच्या हातून उत्तोमोत्तम सामाजिक कार्य घडावे अशा सदिच्छा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी ज्योतीताईंना दिल्या.
यावेळी आपला संवाद चे संपादक किरण किरतकुडवे तसेच त्यांचा मुलगा कुमार आर्यन किरतकुडवे, फोटोग्राफर देवेंद्र रणपिसे हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे