Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीमहाराष्ट्र

लहान मुलीला अश्लील स्पर्श करुन पळाला विकृताला सीसीटीव्हीच्या आधारे बेड्या..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

लहान_मुलीला_अश्लील_स्पर्श_करुन_पळाला
#विकृताला_सीसीटीव्हीच्या_आधारे_बेड्या..

#डोंबिवली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीवी च्या सहाय्याने अटक केली आहे. अमन यादव अस या आरोपीचे नाव आहे आणि त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली मधील एका इमारतीमध्ये एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत असताना तिला एका तरुणाने अश्लील स्पर्श केला. मुलीला जाणवताच ती घाबरली घरी धाव घेत मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो पसार झाला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात या तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला.परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसानी तपासले इतकेच नाही तर एका ठिकाणी तोच तरुण त्याच्या बाईक सह आणखी एका सीसीटीव्हीत कैद झाला.

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या बाईकच्या आधारे त्याचा शोध सुरू करत गाडी शोधून काढली पोलिसांनी विकृत अमन यादव याला ताब्यात घेऊन, त्याला अटक केली आहे. दरम्यान मानपाडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आज या विकृत आरोपीला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे