बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शास्री नगर रुग्णालयातील ‘त्या ‘ वॉर्ड बॉयचे निलंबन अटळ….

अमित जाधव-संपादक

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील रात्रीच्या वेळी झोपा काढत असलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आणि रुग्णाच्या नातेवाईकांशी गैरवर्तन करणाऱ्या त्या वॉर्ड बॉयच्या निलंबनाबाबतच्या कारवाईस सुरुवात झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे .
शास्त्रीनगर रुग्णालयातील वॉर्डबॉयने शुक्रवारी रात्री रुग्णालयात रुग्णास घेऊन आलेल्या नातेवाईकांना शिवीगाळ केली, सदर वॉर्ड बॉय ऑन ड्युटी झोपलेला आढळून आला अशी बातमी आणि व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वापरल झाली तसेच याबाबतचे वृतही अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे .
याची दखल घेवून संबंधित कर्मचाऱ्यांचा सदर घटनेबाबत खुलासा मागविणेबाबत त्यांस कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे .सदर वॉर्ड बॉयला शास्त्रीनगर रुग्णालयात कामावर येण्यास मनाई करण्यात आली असून त्यास कामावरून काढून टाकणेबाबतच्या पुढील कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येत असल्याचे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ . सुहासिनी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केल आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे