0
2
0
9
7
8
शरद पवार यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता दिली. लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरण्यास मान्यता मिळाली आहे. कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0
2
0
9
7
8



