Breaking
महाराष्ट्र

⭕धक्कादायक : घरगुती वादातून मुलाने वडिलांना चाकूने भोसकलं.. उपचारा दरम्यान वडिलांचा मृत्यू तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात……..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

संतोष पडवळ-कार्यकारी संपादक
पुणे, ता 15, : किरकोळ कारणातून घरगुती वादात मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुलाने मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
सातारा शहरातील मंगळवार पेठेत ही घटना घडली असून मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बबन पांडुरंग पवार
(वय- ५६, रा. मंगळवार पेठ, सातारा)
असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तर सूरज पवार (वय- २८) असे संशयित मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी राजू पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बबन पवार हे त्यांचा मुलगा सूरज याच्यासोबत वास्तव्य करत होते.
तक्रारदार राजू पवार हे त्यांचे शेजारी आहेत.
बबन पवार व सुरज पवार यांच्यामध्ये घरी वाद सुरु असताना ओरडण्याचा आवाज ऐकून तक्रारदार राजू पवार हे घरात गेले असता सूरज त्याच्या वडिलांना मारहाण करत होता. राजू पवार यांनी बाप-लेकामधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. बाप-लेकामधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या सुरज पवार याने घरातील धारदार चाकूने वडिलांवर वार केला.
या घटनेत गंभीर जखमी अवस्थेतील बबन पवार यांना राजू पवार यांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
मात्र बबन पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे