बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यातील डम्पिंग कायमस्वरूपी बंद, दिवेकर घेणार मोकळा श्वास ,मा.उप महापौर रमाकांत मढवी यांच्या प्रयत्नांना यश……

अमित जाधव - संपादक

दिव्यातील डम्पिंग कायमस्वरूपी बंद, दिवेकर घेणार आता मोकळा श्वास ,उप महापौर रमाकांत मढवी यांच्या प्रयत्नांना यश……

दिवा (प्रतिनिधी) डंपिंगच्या प्रदुषित धुराच्या कोंडमाऱ्यामुळे मेटाकुटीला आलेली जनता १ फेब्रुवारीपासून मोकळा श्वास घेणार आहे.ठाणे महानगरपालिकेकडून दिव्यात टाकण्यात येणारा आेला आणि सुका कचरा आता भंडार्ली कचरा प्रकल्पाकडे आजपासून वळविण्यात येणार आहे.यामुळे दिव्यातील नागरिकांकडून व बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा करत् एकमेकांना पेढे भरविण्यात आले.

गेली कित्येक वर्षे दिवेकर नागरिक गुदमरले होते.दिव्यातील विकासाला, शहरातीच्या प्रगतीला सर्वात मोठा अडथला हा दिवा डंम्पिंग ग्राऊंडचा लोकांना होता.या डंम्पिंग प्रकल्पातून येणारा उग्र वास येथील लोकांच्या श्वसन प्रक्रियेवर मोठा आघात करीत होता.यामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते.वारंवार लागणाऱ्या आगीमुळे लोकांनी घरे विकून पलायन केले होते.यातून निघणारा धूर संपुर्ण दिवा शहरात पसरायचा.यामुळे लोकं वारंवार हैराण व्हायची.

हा प्रकल्प बंद करावा यासाठी येथील नागरिक,राजकीय संघटना, सामाजिक संघटना या वेळोवेळी प्रयत्न करीत होत्या.प्रसंगी दिवा डंम्पिंग ग्राऊंड बंद व्हावा यासाठी लोकांना अनेक न्यायालयीन चकराही माराव्या लागल्या.आंदोलनाच्या माध्यमातून काही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली  होती.त्यामुळे या सर्व मा.उप् महापौर रमाकांत मढवी यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसुन येत आहे.त्यांनीही डम्पिग हाठवण्यासाठी वेळोवेळी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिलेला शब्द पाळला

दिवा डंम्पिंग बंद होईल याची दिवेकर नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते.परंतु नुकत्याच झालेल्या दिवा महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या दिवशी हजेरी लावलेले ठाण्याचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के यांनी नागरीकांना भर कार्यक्रमात दिवा डंम्पिंग जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बंद  होईल असे सांगितले होते.त्यामुळे आज जानेवारीच्या 31 तारखेलाच दिवा डंम्पिंग बंद करण्यात आल्याने महापौरांनी दिलेला शब्द पाळल्याची प्रचिती आली आहे.

दिव्यातील सर्व मा.नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे