ब्रेकिंग
दिव्यातील साबे गाव येथील शिवसेनेच्या अर्चना निलेश पाटील एन पावसाळ्यात प्रभागातील नागरिकांच्या समस्येसाठी रस्त्यावर….
अमित जाधव - संपादक
दिवा – दिवा पूर्वतील साबे गाव विभागातील जिजाबाई नगर येथे पावसात चाळीतील काही भागात पाणी साचून नागरीकांना चालण्यास देखील अडथळा येत होता ही बाब लक्षात येताच प्रभागातील शिवसेना पक्ष च्या अर्चना निलेश पाटील यांनी भर पावसात पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून कामगार वर्ग व जे सी बी च्या साह्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ठिकाणी पाणी जाण्यासाठी वहिवाट करून दिली यावेळी त्या स्वतः उपस्थित राहून कामगारांकडून कामे मार्गी लावली त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.
यापुढे ही प्रभागातील नागरिकांच्या समस्येसाठी आम्ही ‘कार्य शिवसेनेचे ‘ हे ब्रीदवाक्य मनाशी घेऊन कामे करण्यास अग्रेसर राहू असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.