Breaking
ब्रेकिंग

वृत्तपत्र विक्रेता दिनादिवशी सेंटर शेडचे भूमिपूजन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

⭕️वृत्तपत्र विक्रेता दिनादिवशी सेंटर शेडचे भूमिपूजन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते*

ठाणे, ता 15, ( संतोष पडवळ) : आज 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती त्याच दिवशी वृत्तपत्र विक्रेता दीन २०१८ पासून साजरा केला जातो.वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ असेल, वृत्तपत्र स्टॉल अधिकृत करणे याबाबत आमदार संजय केळकर यांनी राज्याच्या अधिवेशनात विषय मांडून मान्य करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. वेळोवेळी विक्रेत्यांना न्याय मिळवून देतात. ठाण्याच्या तसेच राष्ट्रीय संघटनेचे सल्लागार म्हणून आमदार संजय केळकर हे विक्रेत्यांचे विविध समस्या सोडवत असतात. वृत्तपत्र विक्रेत्यांना ठाण्यात पावसाळ्यात वृत्तपत्र वितरणासाठी खूप त्रास होता, हा विषय आमदार संजय केळकर यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच त्यांच्या निधीतून सेंटर शेड बांधून देणार असे आश्वासन दिले आणि आज वृत्तपत्र विक्रेता दिना दिवशीच त्याचे भूमिपूजन गावदेवी येथे केले गेले.या भूमिपूजन कार्यक्रमाला ठाणे येथील दिलीप चिंचोले, अनिल गोले, विवेक एसामे,प्रदीप बिडलान,सुरेश मस्करे,मनोज गौडा तसेच मुलुंड येथील नरेंद्र गोसावी व सहकारी,दादर येथील संजय सतर्डेकर,दीपक चवण व सहकारी,घाटकोपर येथील दीपक गवळी व सहकारी,अंधेरी ,सायन येथील यादव व सहकरी,माटुंगा येथील विक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच नौपाडा विभागातील नगरसेवक संजय वाघुले, राजेश मढवी व सुनेश जोशी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हातून केक कापून वृत्तपत्र विक्रेता दीन सुद्धा साजरा केला गेला.ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन चे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी बोलल्याप्रमाणे वागणारे आमदार केळकर साहेबांचे आभार मानले व यापुढेही अशाच प्रकारे सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे