दिवा शहरात तन्वी फाऊंडेशन व दक्ष चॅरिटेबल ट्रष्ट च्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न……
अमित जाधव-संपादक
दिवा शहरात तन्वी फाऊंडेशन व दक्ष चॅरिटेबल ट्रष्ट च्या वतीने भव्य रोजगार मेळावा संपन्न……
अमित जाधव-संपादक
कोरोनाच्या काळात अनेक युवावर्गाच्या रोजगावर परिणाम झालेला असताना दिवा शहरात देखील तरुण वर्ग व इतर कष्टकरी नागरिक मोठ्याप्रमाणावर असून त्यांच्या उपजीविकेचे मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना वाढती बेरोजगारी लक्षात घेत दिवा विभागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आज दक्ष चॅरिटेबल ट्रष्ट व तन्वी फाउंडेशन च्या वतीने भव्य रोजगारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते समाजसेवक राजकांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य रोजगार मेळावा आज दिवा विभागातील बी.आर.नगर येथे पार पडला जवळ जवळ 350 ते 400 तरुणांनी सहभाग नोंदवत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ज्योती राजकांत पाटील यांचे अनेक तरुण बेरोजगार वर्गाने आभार व्यक्त करत अभिनंदन केले.
ज्योती राजकांत पाटील यांनी बोलताना स्पष्ट केलं आज बहुतेक युवावर्ग शिक्षित असूनसुद्धा त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत यात मोठ्या प्रमाणात तरुण तरुणीचा समावेश असून ते बेरोजगार आहेत याचीच दखल घेत माझ्या समाजसेवेच्या माध्यमातून आज भव्य रोजगार मेळावा आयोजित केला व असंख्य तरुण व शिक्षित युवावर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या व पुढे ही समाजसेवेच्या माध्यमातून असेच कार्यक्रम राबवले जातील असे त्यांनी सांगितलं.अनेक प्रायवेट लिमिटेड कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेत अनेकांना जागेवर नियुक्ती पत्र देऊन लवकरच कामावर रुजू होण्यास सांगितले.सकाळी 10 पासून दुपारी 4 प्रयन्त शेकडो बेरोजगार वर्गाने लाभ घेत मेळावा संपन्न झाला.


