Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिळ-कल्याण रस्त्यावर देसाई खाडीत सुटकेस मध्ये आढळला तरुणीचा मृतदेह…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता २४ नोव्हें : शिळफाटा – कल्याण रस्त्यावरील देसाई खाडी पुलाखाली नदी पात्राच्या काठाला एका २५ ते ३० वर्षाच्या तरूणीचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी या पुलावरून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांना हा मृतदेह निदर्शनास आला. शीळ डायघर पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या तरूणीला घर किंवा अन्य ठिकाणी मारून तिला सुटकेसमध्ये भरून रात्रीच्या वेळेत देसाई खाडी किनारी आणून टाकले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

देसाई खाडी पात्रात एका तरूणीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून आणून टाकला असल्याची माहिती मिळाल्यावर या पुलावरून जाणाऱ्या मोटार, दुचाकी आणि इतर वाहन चालकांनी वाहने थांबवून घटनास्थळाची आणि संबंधित कोणी परिचित आहे का यासाठी प्रयत्न केले. एकावेळी सर्वच वाहने पुलावर थांबल्याने पुलाच्या एका मार्गिकेत कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस आल्यानंतर त्यांनी एकाही वाहन चालकाला पुलावर वाहन उभे करू नये अशा सूचना केल्या. त्यामुळे पुलाचा मार्ग मोकळा झाला. तरीही अनेक वाहन चालक पुलाच्या दोन्ही बाजुला थांबून घटनास्थळाची माहिती घेत होते. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात कोठे तरूणी बेपत्ता असल्याची नोंद आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या नोंदीवरून या तरूणीची ओळख पटविणे आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे पोलिसांना शक्य होणार असून पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे.

5/5 - (2 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे