दिवा म्हातार्डी गावचे सुपुत्र धर्मेंद्र शेलार यांचा शेकडो पदाधिकाऱ्यांसह भाजप मध्ये प्रवेश….
अमित जाधव - संपादक
शहरात दिवा भाजप च्या वतीने पद नियुक्ती समारंभ आयोजीत करण्यात आला होता यावेळी दिव्यातील अनेक तरुण तरुणींना तालुका पातळीवर पद नियुक्ती देत संधी देण्यात आली तसेच मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश करून कमळ हाती घेतले.
दिव्यातील म्हातर्डी गावचे सुपुत्र व उद्योजक धर्मेंद्र शेलार यांनी भाजप चा झेंडा हाती घेत शेकडो कार्यकर्त्या सहित पक्षात प्रवेश केला त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने ते डोंबिवली शहरातून गेली कित्येक वर्षे भाजप मध्ये सदस्य होते व्यस्त कामामुळे ते सक्रिय नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिव्यातील भाजप पक्षात सामील होत पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजप साठी पुढे मोठया जोमाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करून दिव्यातील भाजप आणखी मजबूत करू असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं



